राजकारण

रात्री कारभाऱ्यांनी घरी जायचं, कारभारणीने केलेलं जेवायचं आणि.., खा. लंकेंच्या पारनेरमध्ये अजितदादांच तुफान भाषण

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार आज (सोमवार) अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर लगेचच अजित पवार यांचा दौरा असल्याने अनेकांचे याकडे लक्ष होते.

आजच्या दौऱ्यात अजित पवार हे पारनेरमध्येही आले होते. यावेळी त्यांनी तुफान भाषण केले. दरम्यान आज खा. निलेश लंके हे पारनेरमध्ये नव्हते. ते आंदोलनासाठी नगरमध्ये आलेले होते.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
नगरचे खासदार निलेश लंके यांचे पारनेर हे होमग्राऊंड असून येथेच दादांनी शेतकरी आणि महिला वर्गाला साद घालत आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार सध्या ज्या योजना राबवत आहेत या योजनांमुळे शेतकरी व महिला वर्गाचा कसा फायदा होईल हे देखील त्यांनी पटवून दिले.

यावेळी त्यांनी लाडकी बहीण याविषयीही महिलांना समजावून सांगितले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना सद् घालत सांगितले की, तीन हॉर्स पॉवर, पाच हॉर्सपॉवर, साडेसात हॉर्सपॉवरचे वीजबील माफ केले असून आता यापुढे शेतकरी म्हणून वीज हवी असेल तर सोलर पंप आता दिले जातील.

पॅनल विहीरजवळ बसणार असून त्यावर मोटार चालेल असे ते म्हणाले. पुढे ते आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले, याचा फायदा असा होईल की, दिवस उगवतच आठ वाजता सोलरचे पॅनल तापतील व तुमची मोटार सुरु होईल.

लाईट जाण्याची भानगड नाही. संध्याकाळी सूर्य मावळला की मोटर बंद होणार आणि त्यानंतर मग रात्री शेतकऱ्यांनी कारभाऱ्यांनी घरी जायचं, कारभारणीने केलेलं जेवण जेवायचं व मुलाबाळांच्यात राहायचं आणि झोपायचं.. असेही ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office