Ahmednagar News : रविवारी दुपारी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांचा जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खर्डा चौकात सोमवारी सकाळी निषेध नोंदविला.
यावेळी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा पदाधिकारी, कार्यकत्यांनी निर्धार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत- जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, केंद्रात सरकार पुन्हा आणण्यासाठी भाजपवाले सर्वसामान्य नागरिकांना चिरडण्याचे काम करत आहेत.
त्याला आमच्यातील काही गद्दारांनी साथ दिली आहे. ते जर चुकले असतील तर त्यांनी परत यावे नाहीतर तिकडेच जावे. जे नेते, कार्यकर्ते यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्यांचा आम्ही सर्वजण राष्ट्रवादी पक्ष म्हणून निषेध करतो. आम्ही सर्वजण खंबीरपणे शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहू, असे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पं. स. माजी सभापती सूर्यकांत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले, सुरेश भोसले, दादा उगले, वैजनाथ पोले, उमर कुरेशी, ईस्माईल सय्यद,
अमित जाधव, वसीम सय्यद, पोले नाना, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, चाँद तांबोळी, बजरंग डुचे, दिगंबर चव्हाण, पिंटू बोरा, राजेंद्र पवार, जुबेर शेख, शहाजी राळेभात, प्रा. आहेरे, कुंडल राळेभात, काकासाहेब कोल्हे, काकासाहेब चव्हाण,
नरेंद्र जाधव, प्रशांत हिरवे, बापूसाहेब शिंदे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सूर्यकांत मोरे यांनीही निषेध नोंदविला व आम्ही शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे सांगितले