राजकारण

Ahmednagar Politics : विखेंसाठीच्या ईव्हीएम पडताळणीत तपासली जाणारी बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणी नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात गेल्या दोन-तीन वर्षांत विखे- लंके वादाने परिसिमा गाठली होती. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे अगदी कार्यकर्त्यांच्या हमरी-तुमरीपर्यंत प्रकरण आले होते. ठरल्याप्रमाणे लंकेंनी विखेंविरोधात निवडणूक लढवली व ते यात जिंकलेही. निकालानंतरही १५ दिवस या दोहोंतील राजकीय वाद समोर येतच राहिले.

दरम्यान एक वृत्त समोर आले ते म्हणजे माजी खा. सुजय विखेंनी ४० केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची न्यायालयाकडे केलेली मागणी. विरोधक ईव्हीएमवर आक्षेप घ्यायचे मात्र आता भाजपचे उमेदवार विखेंनीच पहिल्यांदा आक्षेप घेतल्याने चर्चा झाली.

आता या पडताळणीत ईव्हीएम मशीनमधील बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर या बाबी तपासल्या जातील. निवडणूक आयोगासाठीही ही तपासणी नवीन आहे. कारण या निवडणुकीत पहिल्यांदाच ही पद्धती आली आहे.

यात जिल्ह्यातील अधिकारी काहीही तपासणी करू शकत नाहीत. ईव्हीएम बनविणाऱ्या कंपन्यांचे अभियंतेच ही तपासणी करतात. मशीनची मेमरी सुस्थितीत आहे का? सॉफ्टवेअरने योग्य पद्धतीने काम केले आहे का? एवढीच तपासणी यामध्ये केली जाणार आहे.

बर्न्ट मेमरी म्हणजे काय?
बर्ट मेमरी हा संगणकीय प्रणालीतील शब्द आहे. बर्ट मेमरी म्हणजे अशी मेमरी चीप की ज्यात एकदा लिहिलेला डाटा पुन्हा बदलता येत नाही. त्यात छेडछाड करता येत नाही. ही मेमरी पुसली जात नाही. ईव्हीएम मशीनमध्ये जो प्रोगाम दिला आहे तो या मेमरीमुळे बदलत नाही, तसेच ज्या नोंदी या मशीनमध्ये होतात त्या नष्टही होत नाहीत. यासाठी ही मेमरी महत्त्वाची असते.

मायक्रो कंट्रोलर काय करतो?
मायक्रो कंट्रोलर हा मानवी मेंदूसारखा आहे. त्यात जे सॉफ्टवेअर आहे त्यानुसार ईव्हीएम मशीनची सर्व प्रणाली काम करते. एखादा रोबोट त्याला जो प्रोग्राम दिला आहे त्याप्रमाणे काम करतो. तेच काम मायक्रो कंट्रोलरचे असते.

Ahmednagarlive24 Office