Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण अत्यंत क्रियाशील आहे. अनेक वेगवान घडामोडी नगर जिल्ह्यात घडत असतात. दिग्गज देखील अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात लक्ष ठेऊन आहेत. परंतु आता एक मोठी घडामोड नगर शहरात होणार असल्याचे चित्र आहे.
नगर विधानसभा मतदार संघांवर जिल्ह्याचे लक्ष आहे. महायुतीकडून येथे आ. संग्राम जगताप यांचे तिकीट फिक्स समजले जाते. परंतु महाविकास आघाडीकडून नेमके कोण ? असा प्रश्न सर्वानाच आहे. आता एक मोठी घडामोड सध्या घडली आहे.
पूर्वी नगर तालुक्यात आणि हद्दवाढीनंतर नगर शहरात आलेल्या व राजकारणात दबदबा निर्माण केलेले एक कुटुंब आता राजकारणाची दुसरी इनिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची तुतारी हाती घेऊन करण्याची शक्यता बळावली आहे.
गेल्या काही दिवसांतील हालचाली पाहता या कुटुंबातील व्यक्ती विधानसभेच्या रिंगणात तुतारी चिन्हावर उतरल्यास नवल वाटायला नको. नगरमध्ये राष्ट्रवादीतील फुटीनंतर मजबूत पर्याय शोधण्याचे काम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर नगरच्या राजकारणात दबदबा असलेल्या उपनगरातील एका कुटुंबाचा प्रतिनिधी पवार यांना भेटल्याची चर्चा जोरात आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासूनच्या घडामोडींमुळे नगरमधील सर्वच पक्षांची गणिते बिघडली आहे.
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छा व्यक्त करण्यापूर्वीच अनेक पक्षांचे इच्छूक नव्या आघाडीच्या समिकरणामुळे गपगार झाले आहेत. पूर्वी एकास एक लढतानाही शिवसेना बाजी मारत होती. २०१४ मध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस स्वतंत्र लढली तरीही शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला.
त्यावेळी भाजप आणि शिवसेनेत झालेली मतांची फाटाफूट प्रकर्षाने समोर आली. २०१९ मध्ये खबरदारी घेत शिवसेना-भाजप युती एकत्र लढली. तरीही राष्ट्रवादीने विजयाची पताका झळकावली. परंतु राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्याने आता येथे शरद पवार गट सक्षम उमेदवार शोधत आहेत. त्यातच हे कुटुंब तेथे भेटीस गेलने शंकांना उधाण आले आहे.
लवकरच मोठा कार्यक्रम
हे कुटुंब लवकरच नगर शहरात एक मोठा जंगी कार्यक्रम घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही मोठी घोषणा आगामी काही दिवसात नगर शहरात होणार का हे देखील पाहावे लागणार आहे.