राजकारण

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षकसाठी कोल्हेंची ‘यंत्रणा’ जबरदस्त ! खेडोपाडी पोहोचत आखली राजकीय गणिते

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सध्या सर्वत्र चर्चेचा मुद्दा झाला आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विवेक कोल्हे हे उमेदवारी करीत असून त्यांची प्रचार यंत्रणा आता मतदारसंघातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या पाचही जिल्ह्यांमध्ये अगदी खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवरील शिक्षकांपर्यंत पोहोचली आहे.

विवेक कोल्हे हे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. त्यांची कोपरगाव येथील विविध सामाजिक संघटनांत महत्त्वाची भूमिका आहे. अभ्यासू, सुसंस्कृत, तरुण, तडफदार, राजकीय व सामाजिक जाण असणाऱ्या कोल्हे यांचे नेतृत्व प्रगल्भ आहे.

त्यांच्या याच बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवावी, असा शिक्षक व कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांची प्रचार यंत्रणा प्रभावीपणे सक्रिय झाली आहे.

कोल्हे यांच्या यंत्रणांना पाठबळ म्हणून टीडीएफ संघटनेसह विविध संघटना प्रचाराच्या मैदानात प्रत्यक्ष उतरल्या आहेत. या मतदारसंघात शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनदरबारी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहेत. आता शिक्षकांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी विवेक कोल्हे यांच्या रूपाने संघर्ष करणारे नेतृत्व मिळणार आहे. अगदी काही ठिकाणी शिक्षक स्वतः कोल्हे यांचा प्रचार करत आहेत.

कोल्हेंच्या आश्वासक नेतृत्वाला पसंती
विवेक कोल्हे यांचे नेतृत्व हे सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे आहे. त्यांच्याकडे प्रश्न सोडवण्याचे एक व्हिजन आहे. समस्येचा पाठपुरावा कसा करायचा व ती कशी सोडवायची, याची त्यांना सचोटी आहे. दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही, तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही, अशा त्यांच्या ठोस भूमिकेमुळे त्यांना शिक्षकांची वाढती पसंती आहे.

Ahmednagarlive24 Office