Ahmednagar Politics : सध्या अहमनगरच्या राजकारणात विविध तर्क वितर्काचे, शक्यतांचे दररोज बॉम्बस्फोट पडत आहेत. कोण कुठे उभा राहील याविषयी वारंवार अंदाज घेतले जात आहेत. दरम्यान सध्या लक्ष आहे ते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निर्णयाकडे. त्यांनी आमदारकी लढवायचीच अशी घोषणा केली आहे.
ते राहुरी किंवा संगमनेर मधून लढतील असे दिसते. आ. बाळासाहेब थोरात यांचा सांगमनेर हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथेही विखे कुटुंबीयांनी मोठी फिल्डिंग लावायला सुरवात केली आहे.
माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट संगमनेरमध्ये एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी त्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली.
यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी भावी आमदार सुजय विखे पाटील असतील अशी घोषणाच केली. तसेच भावी आमदार सुजय विखे यांचा विजय असो अशा घोषणाही दिल्या.
नेमके काय घडले ?
एका कार्यक्रमात डॉ.सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आगामी विधानसभेला महायुतीचाच आमदार संगमनेरमधून निवडून द्यायचा आहे. येथे सुरु असणारी मनमानी आता थांबवायची आहे. विकास करायचा असेल तर सत्ता पाहिजे.
त्यामुळे येथून महायुतीचाच आमदार निवडून दिला पाहिजे. माझ्याजवळ कुणाला काही काम असेल तर थेट संपर्क कार्यालयात तुमचे नाव व नम्बर द्या. मी स्वतःहून तुम्हाला संपर्क करील. हे सुरु असतानाच काही उत्साही कार्यकर्त्यांनी भावी आमदार सुजय विखे यांचा विजय असो अशी घोषणाबाजी केली.
तसेच संगमनेरमधून भावी आमदार म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांची आपण एकमताने निवड करत आहोत असा जणू ठरावच केला.