राजकारण

आ. मोनिका राजळे ऍक्शन मोडवर , दिला ‘हा’ मोठा शब्द

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics :  गेल्या साडेचार-पाच वर्षात शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली असून, उर्वरित कालावधीत नागरिकांच्या मागणीनुसार प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही आ. मोनिका राजळे यांनी दिली.

शेवगाव तालुक्यातील वडुले खु. येथील १ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या वडुले खुर्द ते चव्हाणवाडी रस्त्याच्या डांबरीकरण व खडीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी प्रल्हाद तात्या आव्हाड होते. या कार्यक्रमात गावकऱ्यांच्या वतीने आ. राजळे यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच बाळासाहेब आव्हाड म्हणाले की, गेल्या सत्तर वर्षापासून रस्त्याची कामे झाली नाहीत, ती कामे झाली असून, आमच्या पाठपुराव्याला यश आले.

वृद्धा नदीवरील बंधाऱ्यामुळे तसेच जलयुक्त शिवार योजनेमुळे वडुले खुर्द गाव संपूर्ण बागायती झाले असून, शेतीचा पाणीप्रश्न कायमचा मिटला आहे. याप्रसंगी बापूसाहेब पाटेकर, उमेश भालसिंग, राजेंद्र आघाव यांची भाषणे झाली. या वेळी भीमराज सागडे, गणेश गोरडे, महादेव पाटेकर, अनंता उकिर्डे, राजाभाऊ पुंडेकर, गणेश गोरडे, संदीप वाणी, कचरू चोथे, सरपंच भाऊसाहेब आव्हाड,

सुरेश आव्हाड, ग्रा.पं. सदस्य दादा गाडेकर, सोपान रनमले, बाबासाहेब पंढरीनाथ आव्हाड, मंखळराव पांढरे, भगवान तुतारे, महादेव तुतारे, एकनाथ पांढरे, शांतीलाल आव्हाड, माजी सरपंच नारायण आव्हाड, आदिनाथ आव्हाड, आदिनाथ गर्जे,

अशोक आव्हाड, दिलीप आव्हाड, सुखदेव आव्हाड, अनिल मिसाळ, बापूसाहेब आव्हाड, देविदास आव्हाड, सचिन आव्हाड, तात्याभाऊ पांढरे, अशोक पांढरे, आदिनाथ उघडे, भीमराज तुतारे, चंद्रभान उघडे, गणेश पांढरे, राजेंद्र आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, बाबासाहेब खेडकर, विजय आव्हाड, साहेबराव आव्हाड, उपअभियंता प्रल्हाद पाठक, ठेकेदार विष्णू तवले व गावकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिनाथ आव्हाड यांनी केले.

Ahmednagarlive24 Office