Ahmednagar Politics News : महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर. सहकाराची पंढरी अशी ओळख असणाऱ्या या जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण असे हे दोन लोकसभा मतदारसंघ. या दोन लोकसभा मतदारसंघात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. दोन्ही लोकसभा क्षेत्रात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
अहमदनगर दक्षिण लोकसभा क्षेत्रात शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, कर्जत जामखेड आणि श्रीगोंदे हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा क्षेत्रात नेवासे, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, अकोले आणि संगमनेर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात.

या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. मोदी सरकारने 400 पार चा नारा दिला होता. प्रत्यक्षात मात्र एकट्याच्या बळावर भारतीय जनता पक्ष अडीचशे पार सुद्धा होऊ शकले नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला नक्कीच चांगले यश मिळाले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्याच्या दोन्ही मतदारसंघात उलटफेर झाला आहे. मात्र यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार सहजासहजी जिंकून येतील असे नाही. कारण की, गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान 12 आमदारांना जेवढी मते मिळाली होती तेवढी मते लोकसभा निवडणुकीत मिळालेले नाहीत.
म्हणजेच विद्यमान आमदारांच्या क्षेत्रातून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळालेली मतांची टक्केवारी घसरलेली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीच्या उमेदवारांप्रमाणेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी देखील तेवढीच टफ फाईट राहणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2019 च्या निवडणुकीत लंके यांना पारनेर मतदार संघात मिळालेल्या मतांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत सुमारे 9000 मते कमी मिळालेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत लोखंडे यांना 81 हजार 914 मते मिळालीत.
अकोले विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत विद्यमान आमदारांना एक लाख 13 हजार 414 मते मिळाली होती मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना येथून फक्त 38,646 मते मिळालीत. येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना 93 हजार 25 मते मिळालीत.
म्हणजे किरण लहामटे यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का घटला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूरच्या मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे यांना 93 हजार 906 मते मिळाली होती. मात्र महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे जवळपास 89 हजारहून अधिक मते मिळालीत.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपाचे बबनराव पाचपुते यांनी बाजी मारली होती मात्र याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांना 1.18 लाख मते मिळालीत.
एकंदरीत, सध्या जे 12 विद्यमान आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात त्यांचा मतदानाचा टक्का घटलेला दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना आता नव्याने समीकरणे तयार करावी लागणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांना मतांसाठी नवीन गोळा बेरीज करावी लागणार आहे.