Ahmednagar Politics : डॉ.सुजय विखे पाटील हे लोकसभेला पराभूत झाले. त्यांच्या पराभवाची करणीमिमांसा व त्यावर शेलक्या शब्दात टोलेबाजी ते नेहमीच करताना दिसतात. त्यांच्या पराभवाला कुठेतरी कांद्याचे पडलेले भाव देखील कारणीभूत होते असे म्हटले जाते.
याच अनुशंघाने त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. नेप्ती कांदा बाजार समितीचे श्री. भानुदास एकनाथ कोतकर असे नामकरण करण्यात आले त्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
नेमके काय म्हणाले डॉ. सुजय विखे पाटील?
नेप्ती कांदा बाजार समितीचे श्री. भानुदास एकनाथ कोतकर असे नामकरण करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना विखे पाटील म्हणाले, कांद्याने लोकसभेला आपले वेगवेगळे रूप दाखवले. घरी महिला मंडळाच्या डोळ्यात कांदा पाणी काढतो.
तस लोकसभेला कांद्याने मला वेगळ्या पद्धतीने रडवल. कार्यक्रमाची सुरवात करताना मला आयोजकांनी एक दोरी ओढायला लावली. दोरी ओढताच पडदा वर गेला व समोर पाटी होती
व त्यावर लिहिलं होत कांदा ३८ रुपये. जर भाऊंच्या कार्यक्रमालाच कांदा ३८ रुपये होणार होता तर मग हा कार्यक्रम जरा आधी घेतला असता तर मी माजी झालो नसतो अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
इंग्रजी बोलण्यावरून टोलेबाजी
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, माझी मुलगी तुम्ही समोर बोलवली. ती इंग्रजीत बोलली. तर तुम्ही टाळ्या वाजवल्यात. त्यानंतर तुम्हीच साक्षरतेचं व शिक्षणाचं महत्व पटवून दिल व लोकांनी टाळ्या वाजवल्या.
पण हेच महत्व मी दोन महिन्यापूर्वी पटवून दिल होत पण त्यावेळी लोकांनी याचा वेगळाच अर्थ घेतला. परिस्थितीनुसार सगळं बदलत असत अशीही टिपण्णी त्यांनी केली.