कोतकर यांना उमेदवारी नकोच ! माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संभाव्य उमेदवारीला नगर शहरातील मविआचा विरोध, पक्ष नेतृत्वाला दिला इशारा

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांच्या माध्यमातून जागा वाटपावर जोरदार चर्चा असून येता काही दिवसात या दोन्ही गटांकडून जागावाटप फायनल केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. राज्यातील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार आत्तापासूनच वातावरण निर्मिती करण्यात व्यस्त आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात फिरत भेटीगाठी घेत मतपेरणी सुरू केली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांच्या माध्यमातून जागा वाटपावर जोरदार चर्चा असून येता काही दिवसात या दोन्ही गटांकडून जागावाटप फायनल केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

यावेळी या विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजितदादा गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगतापचं निवडणुकीसाठी उभे राहतील असे म्हटले जात आहे. याबाबत घोषणा झालेली नाही परंतु महायुतीने सीटिंग गेटिंग हा फॉर्मुला आणला असल्याने ही जागा अजित दादा गटाला जाईल आणि येथून संग्राम जगताप हे पुन्हा उमेदवारी करतील असे बोलले जात आहे.

महाविकास आघाडी कडून मात्र या जागेसाठी कोण उभे राहणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र या जागेसाठी माजी महापौर संदीप कोतकर हे इच्छुक असल्याचे वृत्त नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये आले होते.

महाविकास आघाडी यावेळी कोतकर यांना उमेदवारी देणार अशी बातमी प्रसार माध्यमांमध्ये नुकतीच झळकली. मात्र कोतकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीच्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातील नेत्यांच्या अन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विरोध केला जात आहे.

नगर शहराच्या राजकारणाच्या झालेल्या गुन्हेगारीकरणाला कायमस्वरूपी आळा घालण्याच्या दृष्टीने मतदारसंघातून अशोक लांडे खून प्रकरणातील दोषी कोतकर कुटुंबीय यांना आणि केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या कोतकरांच्या संभाव्य उमेदवारीला नगरमधील ‘मविआ’चा विरोध आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी कोतकर यांना उमेदवारी देऊ नये यासाठी पक्ष नेतृत्वाला पत्र पाठवले आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे नेते शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम अनिलभैय्या राठोड, माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी पत्र लिहून राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना कोतकर यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली आहे.

महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके यांना हे निवेदन पाठवले आहे. यामुळे कोतकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe