राजकारण

Ahmednagar Politics : ‘राहूल झावरेंकडून राक्षसी पद्धतीने विजय साजरा, ‘त्या’ महिलेशी लंके समर्थकांचे दुष्कृत्य’, चित्र वाघ यांचा मोठा गौप्यस्फोट

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेचे खा. निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. दरम्यान त्यानंतर त्यांच्यासह अनेकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या महीला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मोठा आरोप केलाय.

काय म्हणाल्या चित्र वाघ ?
नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहूल झावरे यांनी राक्षसी पद्धतीने विजय साजरा करण्यास केलेली सुरूवात ही सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण आहे. पारनेर तालुक्यातील एका महिलेस निलेश लंके समर्थक राहूल झावरे

आणि त्यांच्या समर्थकांनी घरात जात जातीवाचक शिवीगाळ केली. तिच्या पोटात लाथा मारून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याच घरातील आणखी एका महिलेस मारहाण देखील करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात आणि राज्यात उमटले आहेत.

आता या मोठ्या ताई त्यांना शिक्षा देणार की पाठीशी घालणारॽ असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निलेश लंके यांचे समर्थक राक्षसी पध्दतीने आपला विजय साजरा करीत आहे. महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून हल्ले करणाऱ्या लंके समर्थकांना ‘मोठी ताई’ पाठीशी घालणार की शिक्षा देणार? असेही त्यांनी म्हटले आहे.

राजकीय वास
दरम्यान दोन दिवसांपूर्वी राहुल झावरे यांच्यावर पारनेर मध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी विजय औटीसह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यावेळी खा. निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला होता.

आता भाजप नेत्या चित्र वाघ यांनी राहुल झावरे यांच्यावर दाखल असेलल्या विनयभंग प्रकरणी प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वास येऊ लागला असल्याची चर्चा आहे.

Ahmednagarlive24 Office