राजकारण

जागा वाटप दूरच.. मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरु ! अजित पवारच मुख्यमंत्री होतील? अहमदनगरमधील ‘त्या’ कार्यक्रमानंतर चर्चांना उधाण

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : महायुतीमध्ये सध्या मुख्यमंत्रीपदाची शर्यत दिसून येते असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार मुख्यमंत्री होतील असे सांगत आहेत.

तर शिंदे गटातील आमदारही एकनाथ शिंदे आमदार होतील असे सांगत आहेत. भाजप देखील राज्यात भाजपचेच सत्ता येईल असे ठामपणे सांगत आहे. त्यामुळे आता जागावाटप तर दूरच त्याआधी मुख्यमंत्रीपदाची शर्यत पाहायला मिळत आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होतील..
महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जन सन्मान यात्रा घेऊन येणार आहेत. आजपर्यंत भरपूर यात्रा निघाल्या असल्या तरी, महाराष्ट्राच्या इतिहासात ही जन सन्मान यात्रा महाराष्ट्रातील जनता उचलून धरेल

असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले असून पुन्हा महायुतीचे सरकार येऊन अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान रॅलीच्या नियोजनासंदर्भात कोपरगाव मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (दि.२८) कोपरगाव येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तटकरे पुढे म्हणाले की, २०१९ ला मतदारांनी २०१४ ची चूक दुरुस्त करून काळे यांच्यासारख्या उच्चशिक्षित तरुणाला विधिमंडळात पाठवले.

गेल्या साडेचार वर्षांतील विकासकामांच्या जोरावर काळे पुन्हा आमदार होतील. साडेचार वर्षात रस्ते, पूल, शेतकऱ्यांचे प्रश्न असे विविध विकासकामे आमदार आशुतोष काळे यांनी केले आहेत असेही ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office