राजकारण

कोल्हे-काळेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा ‘हा’ एकनिष्ठ शिलेदार ‘तुतारी’ वाजवणार? राजकीय ट्विस्ट..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : विधानसभेच्या निवडणुका साधारण दोन ते तीन महिन्यात होऊ शकतात. जसे लोकसभेला वातावरण तयार झाले होते तसेच वातारण आता विधानसभेला पाहायला मिळेल.

दरम्यान लोकसभेला शरद पवार गटाने केलेली कामगिरी उत्तम राहिल्यामुळे विधानसभेला लढण्यासाठी कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही शरद पवार गट आता जोमाने कामाला लागला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदार संघात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे मागीलवेळी अखंड राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते अजित पवार गटात आले. तसेच तेथे सध्या माजी आ. स्नेहलता कोल्हे या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे यंदाचे तिकीट कुणाला मिळणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारण महायुतीमध्ये स्टँडिंग आमदारांना तिकीट देण्याचे ठरले तर काळे यांना तिकीट जाईल मग भाजपच्या माजी आ.कोल्हे यांचे काय? असा मोठा प्रश्न पडतो. त्यामुळे मध्यंतरी कोल्हे हे शरद पवार गटात जाणार असे म्हटले जात होते.

विवेक कोल्हे यांनी शरद अपवर यांची मध्यंतरी घेतलेली भेट यासाठी बोलकी होती. दरम्यान आता कोपरगावमध्ये ट्विस्ट आला आहे.

कोपरगावमधील पवारांचा एकनिष्ठ पवारांच्या भेटीला
शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ऍड. संदीप वर्पे यांनी नुकतीच दिल्लीत जात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पवारांसोबत एकनिष्ठ आहेत.

त्यांच्या या भेटीमुळे आता काळे-कोल्हेंच्या गडात शरद पवारांचा हा खंदा शिलेदार ‘तुतारी’ लाजवेल का अशा चर्चांना उधाण आले आहे. काळे महायुतीमध्ये आहेत. कोल्हे यांनी अद्याप कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही.

त्यामुळे आता मविआकडून संदीप वर्पे यांच्या नावाची चर्चा सध्या समोर येत आहे. शरद पवार वर्पे यांच्यासाठी सकारात्मक असल्याचंही बोलले जात आहे.

वर्पे काय म्हणतात?
या भेटीनंतर वर्पे यांनी बोलताना म्हटले आहे की, २०१४ व २०१९ ला पक्षाने मला उमेदवारी संदर्भात विचारलेले होते. परंतु तेव्हा मी इतरांची नावे सुचवली. परंतु यावेळेला जर पक्षाने जबाबदारी दिली तर पूर्ण ताकदीने आखाड्यात उतरेल असे ते म्हणालेत.

Ahmednagarlive24 Office