Ahmednagar Politics : शुगर लॉबीची आता शिक्षणक्षेत्रातही टक्कर, शिक्षक मतदार आमदारकीसाठी विखे-कोल्हे फाईट, आ.थोरातांचे भाचे विखेंना मदत करतील?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम लोकसभेनंतर १० जून रोजी वाजले होते. पण ही निवडणुक पुन्हा स्थगित करण्यात आली. परिणामी इच्छुक उमेदवारांना त्याच्या तयारीसाठी वेळ मिळाला असून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे

यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाची चाचपणी सुरु केली असल्याची चर्चा सुरु झाली. त्यादृष्टीने त्यांनी प्रत्येकाशी संपर्क करून मतदारांची कुंडली जमा करण्यासाठी संजीवनीची यंत्रणा कामाला लावली. त्यापाठोपाठ आता प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी एका मीडियाच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून

आपली उमेदवारी जाहीर केली. ते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू आहेत. सध्या उत्तरेच्या राजकारणात विखे पाटील आणि कोल्हे परिवार या भाजपत असलेल्या शुगर लॉबीतील दिग्गज परिवारात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. आता या निवडणुकीच्या मैदानात देखील या संघर्षाचे प्रतिबिंब पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करण्याची तयारी डॉ. विखे पाटील यांनी सुरू केली. ते प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्या आहेत.

दहा वर्षांपासून या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आहेत. नगर व नाशिक जिल्ह्यांतील विविध शैक्षणिक संस्थांसोबत त्यांना संपर्क आहे. दुसरीकडे कोल्हे यांना आमदार व्हायचे असेल तर त्यांना सध्यातरी कुणांशीही शत्रुत्व घेऊन चालणार नाही, सहमती एक्सप्रेस त्यासाठी सतत कार्यरत ठेवावी लागते.

विवेक कोल्हेंसाठी मातोश्री माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी अहमदनगर जिल्ह्यातीत शिक्षण संस्था व त्यावर वर्चस्व असलेल्या नेत्यांच्या गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली आहे.

आ. तांबे काय भूमिका घेणार ?
डॉ. राजेंद्र विखे पाटलांचे नाव नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चर्चेत होते. त्यांच्या यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी देखील केली होती. भाजपकडून हिरवा झेंडा दाखवला की प्रचार सुरू, अशी स्थिती होती. त्यावेळचे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. विखे पाटील यांच्यात लढत होईल, असे कयास बांधले जात होते.

मात्र नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर या दोघांची नावे मागे पडली. विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून या मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवले. त्यावेळी डॉ. विखे पाटील यांनी शांत राहाणे पसंत केले. तांबे यांना मदत करण्याची भूमिका घेतली. आता जर विखे विरोधात कोल्हे लढत झाली तर आ. तांबे काय भूमिका घेतील याची चर्चा सध्या सुरु आहे.

कारण आ. थोरात व विवेक कोल्हे यांनी एकत्रित येत उत्तरेत ‘गणेश’ सारख्या निवडणुकी लढवल्या. तांबे हे थोरातांचे भाचे आहेत असल्यानं ते कोल्हे यांना मदत करतील की मागील वेलची जण ठेवत विखेंना सहकार्य करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.