राजकारण

ताईचा गुलाबी प्रश्न, दादांच्या गाली हसू अन दिले ‘गुलाबी’ उत्तर.. नगरमधील ‘त्या’ भन्नाट किस्स्याचीच चर्चा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics :  उपमुख्यमंत्री अजित पवार काल अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर आणि कर्जतमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.

यामधून त्यांनी महिलांशी संवाद साधला. दरम्यान मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुलाबी कलरचे जॅकेट घालत आहेत.

मध्यंतरी त्यांनी १२ गुलाबी जॅकेट तातडीने शिवून घेतल्याची चर्चा होती. आता याच गुलाबी जॅकेटवरून एक गुलाबी प्रश्नांचा किस्सा नगरमध्ये रंगला.

काय झाला किस्सा
नगरमधील एका कार्यक्रमात एका महिलेने पिंक कलर तुमचा आवडता कलर आहे का? असा प्रश्न विचारला. यावर मिश्किल उत्तर देत पवार म्हणाले, आपण वेगवेगळ्या साड्या नेसता, कपडे घालता.

पण, तुमच्या जवळच्या व्यक्त्तीने एखादी साडी खुलून दिसते, असे सांगितले तर आपण वारंवार नेसता. तसे मला पण जवळच्या व्यक्तीने सांगितले, पिंक कलर चांगला दिसतो म्हणून मी पिंक जॅकेट घालतो असे उत्तर दिले. त्यानंतर महिलांमध्ये एकच हशा पिकला होता.

नगर शहरात ३०० पिंक रिक्षा
राज्यातील १७ शहरांत १० हजार महिलांना पिंक रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये नगर शहरात ३०० रिक्षा देणार आहेत. महिलांनी १० टक्के रक्कम भरायची आहे. यात महिलांनी ३५ हजार भरायचे,

तर राज्य सरकार ७० हजार भरणार आहे. उर्वरित ७० टक्के बँकेकडून कर्ज देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर येथील मेळाव्यात सांगितले. या मेळाव्यासाठी मंत्री आदिती तटकरे,

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुण जगताप, सुरज चव्हाण, संपत बारस्कर अविनाश घुले, रेश्मा आठरे, साधना बोरुडे, माणिकराव विधाते, कुमार वाकळे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office