राजकारण

पश्चिमेचे समुद्राला वाहत जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवणार, अहमदनगरकरांची पाण्याची चिंताच मिटणार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : काळे परिवाराने जिव्हाळ्याच्या व आपलेपणाच्या नात्यात कधीही अंतर पडू दिले नाही, हा वारसा आ. आशुतोष काळे पुढे चालवत आहेत. त्यांनी मागणी केली, की पश्चिमेचे समुद्राला वाहत जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविल्याशिवाय पर्याय नाही.

त्यामुळे नार-पार, अप्पर वैतरणा व वळण बंधारे अशा ७५ हजार कोटींच्या प्रकल्पाला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मान्यता देण्याचा प्रयत्न आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आचारसंहितेपूर्वी पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यास मान्यता उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून वाया जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडील उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पास राज्य सरकारने गती द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली.

त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशिर्वाद दिले असून ना. देवेंद्र फडवणीस आणि आपण येत्या आचारसंहितेच्या आधी या योजनेला मान्यता देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यातील ३०० कोटींच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व माजी आमदार अशोक काळे यांच्या ७१व्या अभिष्टचिंतन सोहळ्यास ते नुकतेच येथे आले होते. यावेळी त्यांनी रिमोट कंट्रोलच्या सहाव्याने विविध विकास कामांचे उद्घाटन केले.

त्याचबरोबर माजी आमदार अशोक काळे यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या. या कार्यक्रमात ते बोलत होते. कोपरगाव मतदारसंघाच्या इतिहासात लोकप्रतिनिधी म्हणून अनेक दिग्गजांनी काम केले; परंतु कोपरगाव मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून सर्व लोकप्रतिनिधीच्या तुलनेत सर्वांत जास्त निधी कोणी आणला असेल,

तर तो आ. आशुतोष काळेंच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आला. मतदारसंघाच्या विकासासाठी ३००० कोटी निधी आणणे येरागबाळ्याचे काम नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. आशुतोष काळे यांचे कौतुक केले आणि विधानसभा निवडणुकीतील पक्षाचा कोपरगावचा शिलेदार ठरल्याचेच अप्रत्यक्षपणे जाहीर केले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नगर जिल्ह्याइतके ताकदीचे नेते एकाही जिल्ह्याला मिळाले नाहीत, त्यात कर्मवीर शंकरराव काळे यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी समर्थपणे चालविला. मीही वशवंतराव चव्हाण यांच्या शिकवणीनुसार बेरजेचे राजकारण करत अशोकरावांना मदत केली.

मी स्वतःला नशीबवान समजतो की मला काळे परिवाराच्या तीन पिढ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली, असे गौरवोद्गारही पवार यांनी काढले.

Ahmednagarlive24 Office