राजकारण

‘पक्षात निष्ठावंतांना स्थान नाही’, अहमदनगरमधील भाजपच्या ‘त्या’ बड्या नेत्याचा विधानसभेला स्वबळाचा नारा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा फटका बसण्याचीशक्यता आहे. पक्षात निष्ठावंतांना स्थान नाही, गळचेपी होते अशी खंत व्यक्त करत एका भाजपच्या बड्या नेत्याने स्वबळाचा नारा दिला आहे.

कर्जत तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी समर्थकांचा मेळावा घेत स्वबळाची घोषणा केली. यामुळे एकप्रकारे भाजपला हा धक्का समजला जात आहे.

कर्जत तालुक्यात भाजपाचे तालुकाध्यक्ष व नंतर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले. अशोक खेडकर हे पक्षातील मोठे प्रस्थ म्हणून सर्व परिचित आहे. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या. मात्र अनेक दिवसापासून खेडकर नाराज आहेत.

खेडकर भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. मात्र त्यांनी पक्ष न सोडण्याचा निर्णय घेतला व स्थिर राहिले. मात्र पक्षात त्यांना व त्यांच्या समर्थकांना दुय्यम वागणूक मिळू लागली. अनेक कार्यकर्त्यांची कामेही होत नव्हती.

त्यामुळे अनेक जण अस्वस्थ होते. तालुक्यातील व विशेषतः गटातील विविध गावातील खेडकर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक कर्जत येथे पार पडली. पक्ष जर कार्यकत्यांना सन्मान देत नसेल तर आपल्याला पूर्वी सारखी ताकद दाखवावी लागेल असा निर्धार अनेकांनी व्यक्त केला.

तालुक्यात कार्यकर्त्यांची होणारी गळचेपी व पक्षाबद्दल अनेकांचा नाराजीचा सूर, व पक्षातील गटा तटाचे राजकारण पाहता व ज्याचे काम नाही, थेट लोकांशी संपर्क नाही अशांनाच पक्ष ताकद देणार असेल तर तालुक्यात पुन्हा गावागावात अशोककाका खेडकर मित्रमंडळाची नव्याने बांधणी करण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला.

याप्रसंगी अशोक खेडकर यांनी बोलताना आपल्या कामाचा लेखाजोखा मांडताना आपल्या कार्यकर्त्यांमध्ये कोणीही दोन नंबर व्यावसायीक नव्हता असे म्हणत सर्वसामान्य व्यक्ती आपल्या बरोबर राहिला,

अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांची काहीशी अपेक्षा नसते. मात्र पक्षात गेली काही वर्षात निष्ठावान म्हणून मेहनत घेणाऱ्यांची गळचेपी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Ahmednagarlive24 Office