Ahmednagar Politics : सध्या आगामी विधासनभेच्या अनुशंघाने विविध हालचाली सुरु आहेत. राजकीय डावपेच आखले जात आहेत. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकाबाबत रणधुमाळी सुरु आहे.
आता यातच विधान परिषदेच्या सभापती निवडीचा मुद्दा समोर आला असून अहमदनगरच्या आमदाराची येथे वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी चर्चा होऊ शकतात व त्या अनुशंघाने निर्णय होऊ शकतात असे म्हटले जात आहे.
सभापती यांची निवड करताना यासाठी आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते. या चर्चेअंती निर्णय घेण्यात येतो. दरम्यान आता हे सभापतीपद मिळावे यासाठी भाजप ठाम असून त्यांच्याकडून सध्या प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे ही नावे पुढे येत आहेत.
भाजपचाच सभापती असावा : बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत भाजपचाच सभापती असला पाहिजे असे वक्तव्य केले होते. यासाठी महायुतीतील 11 घटक पक्षांची चर्चा करावी लागणार असून या चर्चेअंती निर्णय होऊ शकेल असे ते म्हणाले होते.
आता विधान परीषद सभापती निवडीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक विशेष बैठक होईल त्यानंतर बाकी गोष्टी होतील असे म्हटले जात आहे.
अहमदनगरला संधी
आ. प्रा. राम शिंदे यांना जर विधानपरिषदेचे सभापतिपद दिले तर अहमदनगर जिल्ह्याला मोठी संधी मिळेल. तसेच भाजपची स्थिती अहमदनगर जिल्ह्यात आणखी मजबूत होईल.
आगामी विधानसभेच्या अनुशंघाने आता या हालचाली सुरु असल्याचे चित्र आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यापैकी आता कुणाची वर्णी येथे लागेल असे चित्र आहे.