राजकारण

अहमदनगरमधील ‘या’ मातब्बर नेत्याने आता विधानसभेसाठी थोपटले दंड ! पवारांसह प्रस्थापितांची डोकेदुखी वाढली

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे वेध लागले आहेत, तीन तीन बलाढ्य पक्ष एकत्र आल्याने महाविकास आघाडीसह महायुतीमध्येही रस्सीखेच सुरू आहे.

जिल्ह्यात १२ जागा आहेत.यामध्ये आता सर्वात जास्त जागा आपल्याकडेच असाव्यात यासाठी सर्वच पक्ष सध्या प्रयत्नशील आहेत. दरम्यान काही मतदारसंघात तर चौरंगी लढती होतील असे चित्र आहे.

आता हे सगळे सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे एका मातब्बराने शड्डू ठोकला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे देखील विधानसभा लढवण्यास इच्छुक असून तयारी सुरु केली आहे.

शेलार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याने प्रस्थापितांची डोकेदुखी वाढली एवढे मात्र नक्की. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील श्रीगोंद्यावर लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे त्यांचीही डोकेदुखी वाढेल असे दिसते.

अण्णासाहेब शेलार यांच्या आता विधानसभेच्या तयारीमुळे आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा नागवडे यांना धक्का बसला असेल.

या सर्वांना शेलार यांनी नेहमीच राजकारणात मदत केली असून आधी मी त्याग करून सर्वांना मदत करत आमदार केले, आता सर्वांनी मला साथ द्यावी असं वक्तव्य त्यांनी केले आहे.

महाविकास आघाडीत रस्सीखेच
जिल्ह्यातील १२ जागांवरील जागावाटपात सध्या महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने ९ जागांवर हा सांगितला आहे, कॉग्रेसलाही ७ जागा हव्या आहेत, तर ठाकरे सेनेनेही ९ जागांवर डरकाळी फोडली आहे.

त्यामुळे जागावाटप कळीचा मुद्दा ठरण्याचे संकेत आहेत. त्यातच सातत्याने काँग्रेस हरलेली प्रतिष्ठेची ‘शिडीं आता राष्ट्रवादीला हवी आहे. तर ‘श्रीगोंदा, नगर, कोपरगाव, अकोले ‘वर तीनही पक्षांनी दावा ठोकला आहे.

यात जागावाटप ठरण्यापूर्वीच श्रीगोंदा आणि अकोल्यात तर उमेदवारीही जाहीर झाली असल्याने आता मोठी रस्सीखेच महाविकास आघाडीत दिसेल.

Ahmednagarlive24 Office