राजकारण

पालकमंत्री असूनही विखे पाटील वेळ देत नाहीत, फोन उचलत नाहीत..! त्यांच्याच आमदाराच्या तक्रारीनंतर खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका लवकरच होतील असे दिसत आहे. परंतु त्याआधीच महायुतीमध्ये विशेषतः भाजप व राष्ट्रवादीमध्ये असणारी धुसफूस सातत्याने बाहेर येत आहे.

आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अकोल्याचे देखील पालकमंत्री असून ते वेळ देत नसल्याची व फोन उचलत नसल्याची तक्रार आता मिटकरी यांनी केलीये.

सोशल मीडियावर पोस्ट करत मिटकरी यांनी याबाबत वाच्यता केली आहे. तसेच त्यांची तक्रारही करणार असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे आता महायुतीतील त्यांच्याच आमदाराने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
राधाकृष्ण विखे पाटलांसह त्यांच्या कोणत्याच ओएसडी आणि स्विय सहायकांनी फोन घेतले नाहीत अशी तक्रार करत विखे पाटील हे ‘ऑनलाईन पालकमंत्री’ असल्याची टीका आ. मिटकरी यांनी आता केलीये.

सहा महिन्यांपासून ते अकोल्यात आलेले नसून आता जी जिल्हा नियोजन समितीची जी बैठक होणार आहेत त्यालाही विखे पाटील ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील प्रश्न, पूर स्थितीवर चर्चा करावे यासाठी मिटकरी यांनी त्यांना फोन केला होता पण ते फोन उचलत नसल्याने ते संतप्त झालेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अमोल मिटकरी यांनी याबाबत एक पोस्ट केली असून यात त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो शेअर केलाय. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपण अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंबंधी प्रश्नाबाबत आपल्याला संपर्क करत आहे.

परंतु आपला फोन लागत नाहीच शिवाय आपले OSD पडवळ, चव्हाण, पवार, माने यांचाही प्रतिसाद येत नाही. आमदार म्हणून खंत व्यक्त करतोय असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान आता मंत्री विखे पाटलांची तक्रार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office