Ahmednagar Politics : येत्या २६ तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात विखे यांसह नऊ नगरकरांचा समावेश उभे असणाऱ्या उमेदवारांमध्ये आहे. या विधान परिषदेसाठी एकूण २१ जण उभे राहिले आहेत. या निवडणुकीमधून तब्बल १५ जणांनी उमेदवारी अर्ज आज माघारी घेतले.
यामध्ये शिवसेनेने किशोर दराडेंना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) अॅड. संदीप गुळवेंना संधी दिली आहे. राष्ट्रवादीने अॅड. महेंद्र भावसार यांना मैदानात उतरविले आहे. विवेक कोल्हे हे अपक्ष उभे राहिले आहेत.
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ३८ उमेदवारांनी ५३ अर्ज भरले होते. डॉ. राजेंद्र विखे पाटील व सुनील पंडित, दत्तात्रेय पानसरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. एकूण १५ जणांनी माघार घेतली. नगरचे प्रमुख उमेदवार विवेक कोल्हे यांचा अर्ज अपक्ष म्हणून आहे. टीडीएफमध्ये फूट पडल्याने त्यांची ताकद विखुरली आहे.
रिंगणातील उमेदवार
किशोर दराडे (शिवसेना)
संदीप गुळवे (शिवसेना, ठाकरे गट)
महेंद्र भावसार (राष्ट्रवादी)
भागवत गायकवाड (समता पार्टी, नगर)
अनिल तेजा (अपक्ष)
अमृतराव ऊर्फ अप्पासाहेब शिंदे
इरफान मो. इसहाक
भाऊसाहेब कचरे
विवेक कोल्हे
सागर कोल्हे
संदीप कोल्हे
गजानन गव्हारे
संदीप गुळवे
सचिन झगडे
दिलीप डोंगरे
आर. डी. निकम
छगन पानसरे
रणजित बोठे
महेश शिरूडे
रतन चावला
संदीप गुळवे
यांनी घेतली माघार
संदीप गुळवे
मुख्तार शेख
किशोर दराडे
रूपेश दराडे
कुंडलिक जायभाये
दत्तात्रेय पानसरे
रखमाजी भड
सुनील पंडित
बाबासाहेब गांगर्डे
अविनाश माळी
निशांत रंधे
दिलीप पाटील
डॉ. राजेंद्र विखे पाटील
धनराज विसपुते
प्रा. भास्कर भामरे
तालुकानिहाय मतदार व कंसात मतदान केंद्र संख्या