Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. विविध मतदारसंघात दिग्गज तयारीला लागलेत. भाजप यावेळी संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे चित्र आहे.
त्यानुसार दिग्गज जिल्ह्यात फिल्डिंगही लावत आहेत. परंतु हे चित्र जरी एकीकडे दिसत असले तरी दुसरीकडे मात्र भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी, गटबाजी वाढली आहे.
त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात भाजप – महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणायचे याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. पंकजा मुंडे आदींसह दिग्गज तयारीत आहेत. परंतु गटबाजीमुळे मोठे आवाहन त्यांच्या पुढे उभे राहिले आहे.
श्रीगोंदेत आवाहन
श्रीगोंदेत देखील भाजपात गटबाजी दिसतेय. येथे सुवर्णा पाचपुते यांनी जाहीरपणे आमदारकीसाठी दंड थोपटले आहेत.
त्या अगदी जुन्या भाजप कर्यकर्त्यांपैकी एक आहेत. एकनिष्ठ कार्यकर्त्याना यावेळी न्याय मिळेल व तिकीट मला मिळेल असे ते म्हणतायेत.
शिर्डीतही आवाहन
शिर्डीत मंत्री विखे पाटील यांच्या मतदार संघात देखील अशीच स्थिती आहे. प्रभाताई घोगरे असतील किंवा राजेंद्र पिपाडा असतील हे भाजपचेच नेते आहेत. तरी देखील त्यांनी सध्या विखेंविरोधात भूमिका घेतली आहे.
कोपरगाव
कोपरगाव मध्ये विवेक कोल्हे हे भाजपचे माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव. परंतु सध्या ते भपमध्येच असले तरी भविष्यात ते कोणता स्टॅन्ड घेतील याबाबत देखील साशंकता आहे.
शेवगाव पाथर्डीत आवाहन
या विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी मिळावी, असा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केला असून, यासंदर्भात शेवगाव येथे दि.२४ ऑगस्ट रोजी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजप कार्यकत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याने भाजपच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मंगळवारी शेवगाव येथे शेवगाव तालुक्यातील भाजप व मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या मतदारसंघात मोनिका राजळे या भाजपच्या विद्यमान आमदार असून, त्यांच्या विरोधात मुंडे यांनी उघडपणे दंड थोपटले आहेत.
भारतीय जनता पक्षात गेल्या वीस वर्षांपासून एकनिष्ठ राहून काम केले आहे. आता सामान्य माणसांचा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे, यासाठी काम करीत आहोत. शेवगाव येथे (दि. २४) ऑगस्ट रोजी होणाऱ्या निष्ठावंत व भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यास उपस्थित रहा,
आमची भूमिका स्पष्ट करू असे आवाहन भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळभाऊ दौंड यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या शेवगाव येथील मेळाव्याच्या तयारीसाठी पाथर्डी येथे बुधवारी गोकुळ दौंड यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.