राजकारण

Ahmednagar Politics : आगामी विधासभेला संग्राम जगतापांना तिकिटासाठीच करावी लागेल धडपड? भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : नगर शहर विधानसभा मतदारसंघातून गतवेळी सुजय विखे यांना ५३ हजार १२२ मतांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी नगरमधून ३१ हजार ५८६ मतांचे मताधिक्य मिळाले. म्हणजे २१ हजारांनी मताधिक्य घटले.

आमदार संग्राम जगताप, कोतकर हे सोबत असतानाही त्यांचे मताधिक्य घटले. या निकालामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

कशी बदलू शकतील राजकीय समीकरणे
नगर शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला खासदार नीलेश लंके यांच्या विजयामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही नवे नेतृत्व मिळाले आहे. शहरात विखेंना मताधिक्य असले तरी, लंकेंना ७४२६३ मते मिळाली आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे सध्या दिसतायेत त्यापेक्षा वेगळी असू शकतील अशी चर्चा आहे.

भाजप देणार नगर शहरात उमेदवार?
लोकसभेतील पराभवानंतर भाजप नगर शहरात उमेदवार देईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे शहरातील राजकारण ढवळून निघणार आहे. जर तसे झाले तर महायुती असल्याने येथे आ. संग्राम जगताप यांना आमदारकी मिळेल की नाही हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

संग्राम जगताप यांचा संपर्क मोठा
चर्चा काही असल्या तरी आ. संग्राम जगताप यांचा संपर्क मोठा आहे. खासदारकी व आमदारकीची गणिते वेगळी असतात. त्यामुळे आमदारकीचे संख्याबळ जगताप स्वतकडे जास्त खेचू शकतात असा अंदाज आहे. तसेच महायुती असल्याने ही जागा पवार गटाकडे राहील असेही म्हटले जाते.

महाविकास आघाडीकडून इच्छुकांची भाऊगर्दी
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सध्या तीन राजकीय दिग्गजांची नवे सामोरे येत आहेत. यातील एक म्हणजे काँग्रेसचे किरण काळे. त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे देखील आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे दिसते.

तसेच ज्यांनी अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना वाढवली व जिवंत ठेवली असे स्व. अनिलभैय्या राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड हे देखील आमदारकीसाठी इच्छुक आहेत असे समजते.

 

Ahmednagarlive24 Office