राजकारण

Ahmednagar Politics : अजित पवारांकडून ‘अहमदनगर’ टार्गेट ! उद्धव ठाकरेंचा ‘तो’ खास नेता राष्ट्रवादीत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणावर आता सर्वच मातब्बर नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीमधील बंडानंतर अजित पवार यांनी आपली संघटन बांधणी मजबूत करण्यावर भर दिला. आता त्यांनी अहमदनगर जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

आता अहमदनगर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोले तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार डॉ. किरण लहामटे, मंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते. यावेळी अनेक अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश यावेळी केला. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रवेश केलेल्या सर्वच पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

उत्तरेत ताकद वाढवण्यावर भर?

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर अजित पवार यांनी आपले संघटन मजबूत करण्यावर भर दिलेला दिसतो. दक्षिणेत तशी अजित पवार यांची ताकद मोठी असल्याचे दिसते. तशीच मजबूत पकड उत्तरेत निर्माण करण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील असल्याचे दिसते.

विविध नेते आपल्या गोटात घेत ताकद सध्या अजित पवार वाढवत आहेत. नुकतेच त्यांनी संग्राम कोते पाटील यांना सोबत घेत प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त केलं होत. आता त्यांनी डॉ. मनोज मोरे याना गळाला लावलं आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office