राजकारण

अजित पवार संतापले… म्हणाले रोहितला त्रास नको म्हणून ऐकून घेतोय, नाहीतर हिसका दाखविला असता

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी भाषण करत असताना अजित पवार काहींवर चांगलेच संतापले होते.

यावेळी त्यांनी आपल्या शैलीतच समोरील व्यक्तींना चांगलेच खडेबोल सुनावले होते. भाषण सुरू असताना समोर उपस्थितांमधून काही जण विविध मागण्या व सूचना करत राहिल्याने शेवटी न राहवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांचा समाचार घेतला.

तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आमच्या बारामतीत मी बोलायला लागलो की सगळे गप्प बसतात. येथे उगीच रोहितला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय. नाहीतर हिसका दाखविला असता, अशा शब्दांत मध्येच बोलणार्‍यांना अजितदादांनी सुनावले.

जामखेडमध्ये शनिवारी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू होते. यावेळी ते कामांची माहिती देत असताना उपस्थितांमधून काही जण त्यांना सूचना करीत होते. वीज पुरवठा, शेतीमालाचा भाव वगैरे संबंधी मुद्दे मांडत होते. एक दोनदा दुर्लक्ष केल्यानंतर अखेर पवार भडकले. पवारांनी काहींना झापल्यानंतर मात्र सगळेच शांत झाले.

त्यांना चांगले चाललेलं बघवत नाही…

त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद मालेगाव, नांदेड, अमरावती येथे उमटले. हे प्रकार समाजकंटक आणि विध्वंसक वृत्तीच्या लोकांनी घडवून आणले आहेत.

ज्यांना चांगले चाललेले बघवत नाही, असे लोक हे प्रकार करतात. मात्र, याचा फटका सामान्यांना बसतो. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. यासाठी तरुणांचा वापर केला जातो. त्यामुळे तरुणांनी अशा गोष्टींना बळी पडता कामा नये.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office