Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Ajit Pawar : अजित पवार यांनीच आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला? अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar : नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार आरोप केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, अजित पवार यांनीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असे असताना याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले, आख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझी समोर जी भूमिका असते तीच मागेही कायम असते. रोहित पवार आमच्या कुटूंबातला सदस्य आहे. माझा पुतण्या म्हणजेच मुलासारखा आहे. त्याच्याबाबत असे करण शक्य नाही.

असल्या फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही असे घरामध्ये पण वागत नाही. कोण नरेश म्हस्के, मी त्यांना ओळखत नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, मस्के यांनी पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा दावा केला आहे.

MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार उभे होते. यावेळी पवार कुटूंबातील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होती. त्यामुळे अजित पवारसाहेब, आधी आपल्या घरातले बघा, असे मस्के यांनी म्हटले होते.

आता मात्र अजित पवार यांनी याबाबत उत्तर दिले आहे. आता मस्के काय बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत अजून काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.