समाजातील अनेकविध घटना नेहमीच साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मग ती घटना राजकीय असो किंवा सामाजिक. दरम्यान आता एका राजकीय गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एका आगळ्यावेगळ्या रेकॉर्डची सध्या चर्चा सुरु आहे.
हा रेकॉर्ड म्हणजे एकाच कुटुंबात पाच जण एकाच वेळी खासदार झाले आहेत. लोकांनी एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसदेत पाठवले आहे. कुठे झाला हा रेकॉर्ड ? पाहुयात –
हा रेकॉर्ड झालाय आताच्या 2024 लोकसभा निवडणुकीत तोही उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांसह कुटुंबातील पाच सदस्य खासदार झालेत. यूपी राजकारणात नेहमीच यादवांचा दबदबा दिसून आला आहे. युपीमधून तब्बल लोकसभेत 80 खासदार येतात.
यंदाच्या लोकसभेला अखिलेश यादव यांच्यासह त्यांच्या पत्नी व चुलत बंधूही खासदार झालेत. अखिलेश यांच्या पत्नी डिम्पल यादव या देखील आता पती अखिलेश यादव यांसह संसदेत दिसतील. अखिलेश यांच्या पत्नी डिम्पल यादव मैनपुरी मतदारसंघातून तर चुलत बंधू धर्मेंद्र यादव आझमगड मतदारसंघातून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
अक्षय यादव आणि आदित्य यादव हे देखील चुलत बंधू असून त्यांनी अनुक्रमे फिरोजाबाद आणि बदायूं मतदारसंघात विजय मिळवलाय. अखिलेश यांचा समाजवादी पक्ष असून या निवडणुकीत त्यांनी 37 जागा जिंकल्या आहेत. यात त्यांच्याच घरातील पाच जागा आहेत. त्यामुळे या निवडणुकीत यादव कुटुंबाचे एक आगळेवेगळे रेकॉर्ड झाले आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर
उत्तर प्रदेशात भाजपची झालेली घसरण ही लक्षवेधी ठरली. उत्तर प्रदेशात जवळपास ३७ जागेंवर समाजवादी पक्ष निवडून आल्याने भाजपला मोठी घसरण लागल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या ठिकाणी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही म्हणणे दुर्लक्षित केल्याने असे झाल्याचे बोलले जाते.
अनेक भाजप खासदारांचे बॅड रिपोर्ट असतानाही व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगूनही याच खासदारांना तिकीट दिले गेले असल्याची चर्चा काही नागरिक करत होते.