राजकारण

Ahmednagar Politics : रोहित पवार व जयंत पाटील यांच्यात वाद पेटला? अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या शिबीरास रोहित पवार आलेच नाहीत !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा व मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत बंडामुळे दोन गटात विभागला गेला. त्यानंतर शरद पवार व अजित पवार यांनी पक्ष बांधणी मजबूत करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले.

आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने शरद पवार यांनी अहमदनगरमधील शिर्डी येथे शिबीराचे आयोजन केले असून या ठिकाणावरून शरद पवार गट लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकेल. परंतु आज शिबिराच्या पहिल्याच दिवशी मोठी राजकीय घटना घडली आहे.

या शिबिराला आमदार रोहित पवार हेच अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आमदार रोहित पवार गैरहजर राहिले असल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या असून आ.रोहित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

होमपीचवर गैरहजेरी

मागील काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. जयंत पाटील यांनी या यात्रेकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात होते. आज रोहित पवार ज्या जिल्ह्यात राजकीय नेतृत्व करतात

अर्थात त्यांच्या होमपीचवरच राष्ट्रवादीच्या सुरु असलेल्या शिबीराला ते गैरहजर राहिलेत. यामुळे आ.रोहित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया काय?

या सर्व गोष्टीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, आमदार रोहित पवार हे परदेश दौऱ्यावर आहेत. बाहेर असल्याने ते आजच्या शिबीरासाठी येऊ शकले नाहीत. शिबीराची आज आणि उद्या दोन दिवसाची मुदत असून शिबीराची तारीख ठरल्यानंतर त्यांनी मला आधीच कळवले होते की,

ते बाहेरच्या देशात असल्याने गैरहजर असेन असे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान या आजच्या शिबीराला फक्त पदाधिकाऱ्यांना बोलावले असून १७०० लोकांना शिबीराचे निमंत्रण दिले आहे. तरीही आजच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

Ahmednagarlive24 Office