राजकारण

मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड होताच सर्वत्र टाळ्यांचा गजर, मात्र नितीन गडकरी साधे हललेही नाहीत.. व्हडिओ प्रचंड व्हायरल

Published by
Ahmednagarlive24 Office

देशात लोकसभेला NDA ला बहुमत मिळाले. दरम्यन या बहुमतानंतर आता एनडीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. काल शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाली. यावेळी त्यांचेच घटक पक्ष उपस्थित होते.

यावेळी येथे नितीन गडकरी देखील आलेले होते. यावेळी सर्वच उपस्थितांनी मोदींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. परंतु नितीन गडकरी मात्र काहीच रिअक्शन न देता बसून राहिले असा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअरहोत असून यात दिसत आहे की, NDA बैठकीसाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घटक पक्षातील नेत्यांसह भाजपचे अनेक दिग्गज मंडळी आलेली आहे. यावेळी एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या निवडीची घोषणा झाली.

त्यानंतर सर्वानीच उपस्थित नेत्यांनी जागेवर उभे राहुन टाळ्यांचा कडकडाट केला. काहींनी मोदी मोदी असा जयकारा देखील केला. पण नितीन गडकरी जागेवरच बसलेले दिसून येत असून ते टाळीदेखील सुद्धा वाजवताना दिसत नसल्याचा दावा करण्यात येतोय.

प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा
या व्हिडिओतअनेक नेते उभे राहिलेले, कुणी टाळ्या वाजवताना तर कुणी मोदी मोदी घोषणा देताना दिसत आहेत. पण नितीन गडकरी मात्र एकाच जागी शांतपणे हा सोहळा पाहताना दिसून येत आहेत. यावरून प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ काढत असले तरी काही जण ते नाराज असल्याचे सांगत आहेत, तर काही तब्येत ठिक नसल्यामुळे ते जागेवरुन उठले नसल्याचे सांगत आहेत.

नितीन गडकरी म्हणतात..
नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन देत गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात मी काम केले असून देश सुखी व्हावा, संपन्न आणि समृद्ध व्हावा, जागतिक महासत्ता व्हावा यासाठी त्यांनी समर्पणाने काम केले असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी मोदी यांवर स्तूती सुमनं देखील उधळली.

Ahmednagarlive24 Office