Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांच्या बाबतीत एक बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अखर्चिक निधीवरून प्रहार संघटनेकडून आंदोलन केले होते. त्यात दोषी ठरवून आमदार बच्चू कडू यांना धाराशिव न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मात्र या शिक्षेची चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना ‘कामकाज संपेपर्यंत थांबण्याचे सांगत अडीच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच पुढील काळात चांगले वर्तन केले जाईल, असे शपथपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे याची चर्चा रंगली होती.
धाराशिव जिल्हा परिषदेतील दिव्यांग विभागासाठी आरक्षित असलेला निधी खर्च करण्यात आलेला नव्हता. तो तसाच पडूनराहिला होता. यामुळे कडू आक्रमक झाले होते. बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते.
न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी त्या खटल्याचा आज निकाल दिला आहे. याच आंदोलन प्रकरणी आमदार कडू यांना ५०६ कलमाअंतर्गत दोषी ठरविण्यात आले होते. यामुळे त्यांना काय शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यामध्ये प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, बलराज रणदिवे, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत जाधव यांच्यासह पाच संशयित आरोपी होते. या सर्वांना न्यालयाने निर्दोषमुक्त केले आहे. याबाबत 7 वर्षांपासून सुनावणी सुरू होती. अखेर आज निकाल दिला आहे.