Balasaheb Thorat : सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती.
नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवार देयची यावरून हा वाद सुरू झाला होता. काँग्रेसने सत्यजीत यांचे वडील सतीश तांबे यांना तिकीट दिले होतं. पण त्यांनी फॉर्म भरलाच नाही. अखेर सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. सत्यजीत निवडून देखील आले होते.
यानंतर थोरात विरुद्ध पटोले हा वाद समोर आला होता. पटोलेंबरोबर काम करणं शक्य नाही असे थोरात यांनी पत्र लिहून हायकमांडला कळवले होते. मात्र असे असताना आता थोरात त्यांनी थेट विधिमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले आहे. आता त्यांच्या राजीनाम्यावर हायकमांड काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. मात्र काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का आहे.