Balu Dhanorkar : महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव खासदार मैदानात, खासदारांची पेन्शन बंद करण्यासाठी थेट मोदींकडे मागणी

Balu Dhanorkar : राज्यात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला आहे. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लागले आहे. सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक खासदारांना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यातील माजी खासदारांची आर्थिक स्थिती बघून निवृत्ती वेतन देण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रही पाठविले आहे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकूण 4796 माजी खासदार आहेत. या माजी खासदारांवर दरवर्षाला 50 कोटी रुपयांची रक्कम पेन्शनच्या माध्यमातून खर्च केली जाते.

Advertisement

माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, मायावती, सीताराम येचुरी, मणिशंकर अय्यर, अभिनेत्री रेखा, चिरंजीव आणि अनेक मोठ्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे या आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या माजी खासदारांची निवृत्ती वेतनाची रक्कम बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्यामुळे धानोरकर यांच्या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत सध्या राज्यात आमदारांच्या बाबत देखील असाच निर्णय घेण्याची मागणी अनेकांनी केली आहे.

Advertisement