BhagatSingh Koshyari : कालच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. असे असताना आता महाराष्ट्र सोडून जाण्याची तयारी सुरु असतानाच कोश्यारी यांच्यावर आमदारकीसाठी पैसे घेतल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील उद्योगपती आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष अशोक नाथ यांनी कोश्यारी हा गंभीर आरोप केला आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्यात महाराष्ट्राच्या अस्मिता पुरुषांचा अपमान केल्याचा आरोप झाला. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती.
यामुळे कोश्यारी यांच्याकडील राज्यपाल पद काढून घेण्यात आले आहे. दरम्यान, संतोष अशोक नाथ यांनी राज्यपाल असताना कोश्यारी यांनी आमदार करण्यासाठी आमचे पैसे घेतले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांनी आमची आमदार म्हणून शिफारस केली होती.
त्यानुसार त्यांनी आम्हाला ती आमदारकी त्यांनी आम्हाला द्यावी आणि महाराष्ट्र सोडावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता यावर चौकशी होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.
अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे. रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.