Bhaskar Jadhav : भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिट बुक केले होते, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता.
असे असताना मात्र भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याने त्यांना गटात घेण्यात आले नाही असेही ते म्हणाले. यामुळे आता भास्कर जाधव यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला आणि 22 जून रोजी बंडखोर आमदार गटात सामील होण्याची विनंती केली. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवण्यास योग्य नसल्यामुळे त्यांना गटात घेण्यास एकनाथ शिंदेजी नाखूष होते.
भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकिटही बुक केले. भास्कर जाधव हे सत्य नाकारू शकतात का?, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर झालं आणि भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
असे असताना भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे यांच्यावर रोज टीका करत आहेत. अनेक मंत्री भाजप नेते यांच्यावर ते निशाणा साधत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव हे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत.
सध्या भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे महत्वाचे नेते झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या एकाही नेत्याला ते सोडत नाहीत. यामुळे ते कायम चर्चेत असतात. तसेच ते अनेकदा अडचणीत देखील आले आहेत.