मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
ही धादांत खोटी माहिती आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरणनिर्मिती करत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भात माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे अमित ठाकरे कॅबिनेट मंत्री होणार असल्याच्या चर्चेला तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, हा कोणीतरी केलेला खोडसाळपणा आहे. कोणी तरी मुद्गामहून राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण करण्यासाठी हे वृत्त पसरवत आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावाचा वापर करुन राज्यात वेगळ वातावरण निर्णाण करण्यात पयत्न सुरू आहे, असे राज ठाकरे यांनी म्हणाले आहेत.