Chandrasekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव आपल्या पक्ष विस्तारासाठी आता बाहेर पडत आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रात सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्रात नवे मित्र हवेत. यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. असे असताना बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली.
यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. सोळंके यांनी हैदराबादमध्ये त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावेळी प्रकाश सोळंके यांनी त्यांचे कौतुक देखील केले आहे.
तेलंगणामधील शेतकरी हा सर्वगुणसंपन्न आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील तेलंगणामधील शेतकऱ्यांसारखे सुखी आणि समाधानाचे जीवन जगता आले तर खूप बरे होईल, असे ते म्हणाले. सध्या केसीआर हे राज्यात मित्र शोधत आहेत.
यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली होती. तसेच माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचीही केसीआर यांच्यासोबत भेट झाली होती. यामुळे याची बरीच चर्चा रंगली होती.
दरम्यान, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या BRS या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे महाराष्ट्रातील एक तगडा नेता BRS ला मिळाला आहे. राज्यात त्यांच्या सभा देखील होत आहेत.