Ahmednagar Politics : माझी जन्मभूमी जरी चोंडी असली तरी राजकारणात मला घडवणारी जवळेश्वर येथील पावन भूमी जवळा ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे येथील विकासकामासाठी आलेल्या प्रत्येक निवेदनाची मी काळजीपूर्वक दखल घेऊन तो विषय मार्गी लावला.
गावासह प्रत्येक वाड्यावस्तीवरील विविध विकासकामासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. त्याच अनुषंगाने आज जवळा येथील ग्रामस्थांना दोन कोटी रुपयांचे विविध विकासकामाचे बक्षीस दिले आहे.
माझ्यावर व भारतीय जनता पार्टीवर असेच विशेष लक्ष राहू द्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहू द्या, असे मत आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केले.
जवळा येथील भाजपचे युवा नेते उमेश रोडे मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार केला. यावेळी आ. शिंदे बोलत होते. याप्रसंगी नागरिकांनी सत्यपाल महाराजांचे किर्तन ठेवले होते.
यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, ज्योती क्रांतीचे चेअरमन आजिनाथ हजारे, व्हा. चेअरमन दशरथ हजारे, संचालक मारुती रोडे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे, ग्रा.पं. सदस्य प्रशांत पाटील, भाजप वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. दीपक वाळुंजकर, ग्रा.पं. सदस्य किसन सरोदे, पांडुरंग शिंदे, सोसायटीचे व्हा. चेअरमन शिवाजी कोल्हे,
संचालक राजेंद्र हजारे, रामलिंग हजारे, उमेश हजारे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष हबीब शेख, राजेंद्र महाजन, अभिनव हजारे, मारुती गोरे, सतीश हजारे, युवराज मेहर, राजेंद्र हजारे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रा. राम शिंदे यांचे समर्थक उमेश रोडे यांनी केले होते.