राजकारण

नगरकरांनो तुमच्या भागातील रस्त्यांचे कामे का रखडलीयेत ? हे घडतंय राजकारण..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह काही उपनगरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. अनेक भागात अर्धवट रस्ते तसेच राहिले आहेत. वरील सत्ताधाऱ्यांच्या स्थगिती राजकारणाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

महाविकास आघाडी सरकारने नगर शहरातील विविध विकास कामांसाठी ७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता परंतु सत्तांतर झाले आणि या मंजूर निधीला शिंदे सरकारने स्थगिती दिली.

दरम्यान ७ डिसेंबरला राज्यातील इतर सर्व ठिकाणच्या निधी खर्चावरील स्थगिती हटवली असली तरी अद्याप शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी शासनाकडून मिळवलेल्या सुमारे १५ कोटींच्या कामांना जी स्थगिती दिली गेली ती अद्याप उठवली गेली नाहीये.

याचाच परिणाम म्हणून सिव्हील हडको, केडगाव व इंडस्ट्रीयल इस्टेट मधील १८ प्रमुख रस्त्यांची कामे रखडली आहेत.

महापौरांच्या कामाला वरूनच ब्रेक

महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला. त्यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांकडून नगर शहरात रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला. यामध्ये केडगाव, इंडस्ट्रीयल इस्टेट व सिव्हील हडको येथील रस्त्यांसाठी १५ कोटींचा निधी होता.

त्यानंतर या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून कामांच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या. परंतु वरती सत्तांतर झाले. व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व या सरकारने या कामांना स्थगिती दिली. तसेच माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी हद्दवाढ योजनेचा हा निधी असून यात चुकीच्या कामांचा समावेश असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे आजतागायत ही स्थगिती कायम असल्याचे सांगितले जात आहे.

कोणत्या रस्त्यांची कामे रखडली आहेत?

सिव्हिल हडकोतील मिस्किन मळा ते बिशप लॉइड कॉलनीपर्यंत जोडला जाणारा मेघाग्नी चौक ते हिरानंदानी मार्ग ते भगत मळा ते गणेश चौक ते मकासरे हेल्थ क्लब व पराग कॉर्नर ते भगत मळा या अंतर्गत रस्त्याचा समावेश आहे.

त्याचबरोबर केडगाव येथे झेंडा चौक ते वैष्णवनगर, भूषणनगर येथे राधेश्याम कॉम्लेक्स ते फुंदे घर, अयोध्यानगर चौक ते शंभूराजे चौक, रभाजीनगर सापते घर ते पवन कोतकर घर, मुरकुटे घर ते नेप्ती रोड रस्ता व केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील १२ अंतर्गत रस्ते आदींची कामे रखडली आहेत.

 राजकारण झाले पण ते शिंदे गट – भाजपलाच नडले !

वरील सत्ताकारणामध्ये ज्या कामना स्थिगिती दिली त्यात शिंदे गट – भाजपच्याच नेत्यांची गोची झाली. कारण ज्या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली त्यातील बहुतांश प्रस्तावित रस्ते सत्ताधारी भाजप व शिंदे गटाच्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या भागातील असल्याने येथील नागरिकांना त्यांनाच तोंड द्यावे लागत आहे.

त्यामुळे या स्थगितीचा फटका शिंदे गटव ‘भाजपलाच अधिक बसला आहे. दरम्यान रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे, लवकरच ही कामे मार्गी लागतील असे शिवसेना शिंदे गटाच्या एका नेत्याने सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office