राजकारण

Ahmednagar Politics : विकास काय असतो हे भाजपाच्या माध्यमातून नगरकरांना समजल – शिवाजीराव कर्डीले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : वडगाव गुप्ताच्या हददीत महाराष्ट्र सरकारची असलेली पाचशे एकर जागेत विखेंनी स्वत पुढाकार घेउन ती जागा एमआयडीसी उभा व्हावी याकरीता प्रयत्न सुरू आहेत

जर पाचशे एकरमध्ये एमआयडीसी उभी राहली तर रोजगार उपलब्ध होईल व बेरोजगाराच्या हाताला काम मिळेल अभ्यासू खासदारामुळे विकास पाहायला मिळत आहे

विकास काय असतो हे भाजपाच्या माध्यमातून नगरकरांना समजला आहे, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केले.

वडगावगुप्ता येथील १.३४ कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन आमदार शिवाजीराव कर्डीले व सौ धनश्री सुजय विखे पा यांच्या हस्ते पाण्याच्या टाकी जवळ दत्तमंदिर परीसर, फोर्जिंग कॉलनी व भैरवनाथ मंदिर, माळवाडी व स्मशानभूमी येथे संपन्न झाला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती नगरचे उपसभापती रभाजी सुळ, वडगावगुप्ता ग्रामपंचायत सरपंच सौ सोनुताई विजय शेवाळे, उपसरपंच व सर्व ग्रा प सदस्य वडगावगुप्ता विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office