आमदार लंके आणि आमदार शिंदे यांच्यात जवळीकता वाढली ! म्हणाले आम्ही एकत्र…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : दिवाळी सणाच्या निमित्ताने भाजप नेते, माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमात आमदार नीलेश लंके आणि आ. शिंदे यांनी एकमेकांना बालुशाही भरवत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच कानात हितगुज साधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या कार्यक्रमास खा. सुजयदादा विखे पाटील यांनीही हजेरी लावत आमदार शिंदे यांना बालुशाही भरविल्याने दिवसभर खमंग चर्चा रंगल्याचे पहावयास मिळाले.

सध्या जिल्हाभर अनेक राजकीय नेत्यांच्या वतीने फराळाचे कार्यक्रम सुरु असून चौंडीतही आ. शिंदे यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राम शिंदे यांनी चौंडी गावात तसेच आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या हंगा गावात फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मात्र तरीही आ. लंके यांनी आ. शिंदे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. गेल्या काही महिन्यांपासून आमदार लंके आणि आमदार शिंदे यांच्यात जवळीकता वाढल्याचे दिसून येत आहे.

अर्थात याला राजकीय किनार आहे, असेही बोलले जातेय. एकाच दिवशी लंके आणि शिंदे यांनी फराळाचा कार्यक्रम आपापल्या गावात ठेवलेला असला तरी आमदार लंके यांनी सकाळीच चौंडी गाठत राम शिंदे यांच्या फराळाचा आनंद लुटला.

यावेळी आ. सुरेश आण्णा धस, आ. बबनराव पाचपुते, आ. संग्रामभैय्या जगताप, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे उपस्थित होते. कार्यकत्यांच्या आग्रहास्तव यावेळी आमदार शिंदे आणि आमदार लंके यांनी एकमेकांना गोड बालुशाही भरवत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत !

आमदार निलेश लंके यांनी आपण पक्षात असतानाही पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या माझ्या गटातील कामांना निधी देत खूप मदत केली. विरोधी पक्षात असतानाही आमचा स्नेह कायम होता आणि आता तर आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत.

त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात कसलेही राजकारण न आणता मी चौंडीत त्यांच्याकडे फराळाला आलो असल्याचे सांगत राजकीय बोलणे टाळले.