राजकारण

Ahmednagar Politics : कोट्यवधी रुपयांची देणी थकवली ! साईकृपा कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगितीदेण्याची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा कारखान्याकडील शेतकरी, कामगार आणि वाहतुकदारांची थकित देणी तत्काळ देण्यात यावीत, या मागणीसाठी ‘बीआरएस’ चे तालुका समन्वयक टिळक भोस आणि तत्कालीन कर्मचारी विशाल सकट यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विक्रमसिंह पाचपुते व भागीदारांच्या यांच्या मालकीच्या हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याकडे शेतकरी, कामगार आणि वाहतुकदारांची देणी थकलेली आहेत.

मात्र, कारखान्याने सर्व देणी दिलेली असल्याची खोटी माहिती सादर करून कारखाना विक्रीचा घाट घालण्यात आला आहे. कारखान्याने थकीत पैसे तत्काळ द्यावेत, अन्यथा कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

त्याचबरोबर सर्व देणी दिल्याशिवाय कारखान्याला गाळप परवानादेखील देऊ नये. टिळक भोस म्हणाले, आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उभारणी झालेल्या साईकृपा साखर कारखान्याने सामान्य जनतेची कोट्यवधी रुपयांची देणी थकवली आहे.

त्यामुळे सर्व देणी दिल्याशिवाय आम्ही कारखाना चालवू देणार नाहीत. यावेळी ‘बीएसएस’चे घनश्याम शेलार, शरद पवार, युवराज पळसकर, युवराज उबाळे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office