Ahmednagar Politics : ‘दक्षिणेची निवडणूक विखेंविरूद्ध लंके नाहीच.. पिक्चर अभी बाकी है’

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील लोकसभेच्या निवडणुकीच्या फीव्हरने आता जोर पडकला आहे. अद्याप उमेदवारी अर्ज भरण्याचे बाकी आहे. सध्या भाजपकडून खा. सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून निलेश लंके मैदानात उतरले आहेत.

दोघेही सध्या जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान आता खा. सुजय विखे यांनी दक्षिणेची निवडणूक विखेंविरूद्ध लंके नाहीच असे सूतोवाच केले आहे. ब्राम्हणी (ता. राहुरी) येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे , जिल्हा बँकेंचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना खा. सुजय विखे म्हणाले, लोकसभेची हि निवडणूक विखे विरुद्ध लंके नसून विखे विरुद्ध पवारांमध्ये आहे. सन १९९१ पासून आतापर्यंत त्यांनी विखे यांना विरोध केला. मात्र दीड महिन्याची स्वनिर्मित केलेली लाट ही ५० वर्षाच्या विखे कुटूंबियाच्या त्यागावर भारी पडणार नाही.

विखे कुटूंब गेल्या पन्नास वर्षापासून जनसेवेत आहे. या लोकसभेला आपण सर्वाधिक लिड पारनेर तालुक्यामधून घेणार आहोत. ‘कामोठे’ येथे याचा ट्रेलर दाखविला आहे. पिच्चर तो अभी बाकी है! असे म्हणत खासदार सुजय विखे यांनी आ. निलेश लंके यांना इशारा दिला आहे.

प्रसंगी सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, केंद्रांच्या योजना तळागाळापर्यंत पोहचल्या आहेत. त्याचा शेतकरी व सर्वसामान्य जनतेला कसा फायदा झाला हे प्रत्येकाला समजावून सांगा. समोरच्या उमेदवाराची हवा असल्याचे काहीजण चर्चा करतात मात्र हवा ही टिकत नसते.

के वळ हवेवर अन् व्हिडिओवर निवडणुका होत नसतात. समोरच्याला दिलेले आश्वासन आपण कसे पुर्ण करणार, देशात तुमचे फक्त दहा उमेदवार आहेत त्यातील निम्म्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. त्यामुळे देशात मोदींचे सरकार येणार आहे. म्हणून विकासासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या मेळाव्यास बाळकृष्ण बानकर, विक्रम तांबे, नामदेव ढोकणे, उदयसिंह पाटील, अमोल भनगडे, दत्तात्रय खुळे, धिरज पानसंबळ, राधेश्याम लहारे, तान्हाजी धसाळ, साहेबराव म्हसे, उत्तमराव म्हसे, विजय बानकर, गिरीराज तारडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe