राजकारण

Devendra Fadnavis : फडणवीसांचा गौप्यस्फोट पवारांनी नाकारला, म्हणाले, फडणवीस सभ्य माणूस..

Published by
Ahmednagarlive24 Office

Devendra Fadnavis : ज्याची सर्वांना उत्सुकता होती, तो पहाटेच्या शपथविधीबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी आज अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीची कल्पना शरद पवारांना होती, असे म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तसेच अजित पवार बोलले तर मी अजून बोलेन असेही ते म्हणाले. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत माणूस आहेत. सभ्य माणूस आहेत. ते असत्याचा आधार घेऊन अशी वक्तव्य करतील, असं मला कधी वाटलं नाही.

तसेच फडणवीसांनी कोणत्या अधारावर विधान केले असेल, असे शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर फडणवीसांनाच विचारा, यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते.

दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झाले होते त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असे खळबळजनक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. 2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही तासांचे सरकार स्थापन झाले होते.

विशेष म्हणजे भल्या पहाटे या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला होता. यावर अजूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बोलले नव्हते. आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यावर बोलले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office