राजकारण

Ahmednagar News : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तडजोडी करू नका – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तडजोड करू नका, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा सर्वांनी यशस्वी करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

आमदार मोनिका राजळे, आमदार राम शिंदे, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, जालिंदर वाकचौरे, भैया गंधे आदी यावेळी उपस्थित होते.

विखे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित होऊ शकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक मुख्य केंद्र झाले आहेत.

महिला आरक्षणाचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यात सर्वांनी सहभागी होऊन यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तडजोड करू नये, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकत्यांना दिला.

Ahmednagarlive24 Office