Ahmednagar Politics : ‘उत्तर नगरचं ‘जितराब’ दक्षिणेत येऊ देऊ नका..’ ! १९९१ मध्ये शरद पवारांनी केलं होत आवाहन अन विखे-पवार घराण्यात पहिली ठिणगी पडली..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस देशभरात विस्तारत गेली. देशभर काँग्रेसचेच राज्य होते. जनमानसात काँग्रेस रुजलेली होती. परंतु त्याकाळीही पक्षांतर्गत बंडखोरी होतच असायच्या.

हीच बंडखोरी कारणीभूत ठरली पवार व विखे घराण्यातील राजकीय संघर्षाला. १९९१ मध्ये अहमदनगर दक्षिण मतदार संघाची निवडणूक लागली. त्यावेळी काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना उमेदवारी जाहीर दिली.

लोकसभेसाठी इच्छुक आणि गडाखांच्या उमेदवारीने नाराज लोणीच्या बाळासाहेब विखेंनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यावेळी विखे यांना ‘सायकल’ चिन्ह मिळाले व त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला.

उमेदवारांनी अर्ज भरले, चिन्ह मिळाले, प्रचार रंगात आला. काँग्रेस उमेदवार गडाख यांच्या विजयासाठी आणि विखेंना पराभूत करण्यासाठी शरद पवारही मैदानात उतरले.

विखेंवर शेलक्या भाषेत टीका सुरू केली. उत्तरेतील जितराब (जनावर) दक्षिणेत येऊ देऊ नका, असे आवाहन मतदारांना केले. त्यावेळी विखेंनी ‘सायकली’ वाटप केल्याची चर्चा होती. याचा उल्लेख करत पवारांनी विखेंवर पैसे व सायकली वाटपाचा आरोप केला.

तसेच पैसे, सायकली घ्या, पण मतदान काँग्रेसलाच करा, असे आवाहन केले. पुढे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले. विखेंनी बदनामी व आचार संहिता भंगाचा दावा ठोकला.

खटल्यासाठी दोन्ही पक्षकारांचा छत्रपती संभाजीनगरातील हॉटेलात मुक्कामही असायचा. कोर्टाने गडाखांना ६ वर्षांची निवडणूक लढवण्यावर निर्बंध घातले. पवारांनाही नोटिस बजावली होती. हा खटला राज्यभर चांगलाच गाजला.

पवार-विखे वैचारिक मतभेद , मंत्रिपदातही अडसर

पवार आणि विखे कुटुंबाचे वैचारिक मतभेद होतेच. बाळासाहेब विखे हे काँग्रेसच्या शंकरराव चव्हाण गटाचे, तर शरद पवार यशवंतराव चव्हाणांचे खंदे समर्थक.

पवारांनी दिल्लीतील वजन वापरुन विखेंना कधीही काँग्रेसच्या सत्तेच्या कालखंडात मंत्रीपद मिळू दिले नाही असे म्हटले जाते. काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विखेंना वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले होते.

नेहरूंच्या हस्ते उदघाटनासाठी १० वर्षे थांबवला होता उद्घाटन सोहळा

पद्मश्री विठ्ठलराव विखेंनी १९५० मध्ये पहिला सहकारी कारखाना उभा केला, पण तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हस्तेच उद्घाटन व्हावे, यासाठी १० वर्षे उद्घाटन थांबवले.

१९६१ मध्ये नेहरूंनी विखेंच्या कारखान्यात पहिली ऊसाची मोळी टाकली होती असा इतिहास आहे.