राजकारण

Ahmednagar News : ‘खा. डॉ.सुजय विखेंच्या साखर वाटपाचा कार्यक्रम आपल्या वॉर्डात घेऊ नये, अन्यथा नगरसेवकांवर कारवाई !’ पहा कुणी काढले फर्मान

Published by
Ahmednagarlive24 Office

भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात व दक्षिण मतदार संघात साखर वाटप व डाळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. शहरातील भाजप नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या व शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हे देखील आपल्या प्रभागात हा कार्यक्रम घेत असल्याचे दिसते.

दरम्यान या त्यांच्या कार्यक्रमावरून अनेकदा त्यांच्यावर राजकीय आरोपही झाले. तर अनेकांनी यास आगामी लोकसभेची मतदारांपर्यंत पोहोचण्याची राजकीय खेळी असेही म्हटले. दरम्यान खा. विखे यांनी मात्र श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा हा सर्वानी दिवाळी म्हणून साजरा करावी यासाठी हे वाटप सुरु असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान आता अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मात्र, त्यांच्या नगरसेवकांना सूचना देऊन खासदार विखेंची साखर प्रभागात वाटू नका, अन्यथा पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी कारवाई करू, असा इशारा देण्यात असला असल्याची माहिती समजली आहे.

साखर वाटप कार्यक्रम न करण्याबाबतचा हा संदेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर रोहिणी शेंडगे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड आदींच्या नावाने व्हाट्सअप ग्रुपवरून देण्यात आला असल्याची माहिती समजली आहे.

काय आहे हा मॅसेज ?

‘सर्व नगरसेवक व शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती.. भाजपाचे खासदार सुजय विखे यांच्यावतीने संपूर्ण नगर शहरात साखर वाटपाचा घेण्यात येत आहे. ते शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना फोन करून हा कार्यक्रम आपल्या आपल्या वॉर्डात घेण्यास सांगत आहे.

तरी मी सर्व नगरसेवकांना व पदाधिकारी यांना विनंती करतो की, साखर वाटपाचा हा कार्यक्रम आपल्या वॉर्डात घेऊ नये. जर हा कार्यक्रम कोणत्याही नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांनी घेतला तर ही पक्ष विरोधात भूमिका समजून त्या संदर्भात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तक्रार पक्षाकडे केली जाईल’, असे या संदेशात म्हटले आहे.

खासदार विखे यांचा वैयक्तिक कार्यक्रम

दरम्यान या शिवसेनेच्या (ठाकरे गट) एका पदाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, साखर वाटपाचा कार्यक्रम हा खासदार विखे यांचा वैयक्तिक कार्यक्रम आहे, यात शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही, पक्षशिस्तीच्या दृष्टीने हे योग्य नाही, त्यामुळे नगरसेवकांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office