राजकारण

खा. सदाशिव लोखंडेंची ‘खरी’ ओळख ! पूर्वीचे शिवसैनिक नव्हे तर आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक.. ३ वेळा आमदार व २ वेळा खासदार असणाऱ्या लोखंडेंचा ‘असा’ आहे खरा जीवनप्रवास

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगरच्या राजकारणात लोकसभेला भाजप, शिवसेनेला बहुमत राहिलेले आहे. दक्षिणेत तर मागील १५ वर्षांपासून भाजपचाच खासदार आहे. शिर्डीमध्ये देखील १० वर्षांपासून शिवसेनेचा खासदार आहे. शिर्डीमध्ये सध्या मागील १० वर्षांपासून शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत.

ते सध्या शिंदे गटात गेले आहेत. अनेकांना हे माहित नाही की ते ३ वेळेस आमदार राहिले आहेत. परंतु खा. सदाशिव लोखंडे हे खरे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत. त्यांचा खरा जीवनप्रवास अनेकांना माहित नसेल.

 चेंबूर ते शिर्डी पर्यंतचा ‘असा’ राजकीय प्रवास

सदाशिव लोखंडे यांचे मूळगाव कर्जत तालुक्यातील आहे. परंतु त्यांचे बालपण चेंबूरमध्ये गेले असून ते शालेय वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी जुळले गेले. त्यांचा त्यानंतर थेट भाजपशी संबंध आला व दिवंगत माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांनी लोखंडे यांना भाजपमध्ये अनेक पदे दिली होती.

पुढे जाऊन ते १९९० मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. ते भाजपकडून उभे होते. विश्वहिंदू परिषदेने मोठी ताकद येथे लावली होती. परंतु यावेळी त्यांचा काँग्रेस उमेदवाराने पराभव केला.

परंतु पुढे जाऊन जेव्हा बाबरी मशिद पडली तेव्हा संघ परिवार व भाजपची ताकद जनमानसात वाढली होती. यामधेच ते १९९५, १९९९ व २००४ असे सलग तीन वेळा कर्जत-जामखेडमध्ये आमदार म्हणून निवडून आले.

लोखंडे हे मतदार संघात जास्त दिसत नाहीत, अशा तक्रारी त्यावेळी आल्याने त्यांना पुन्हा संधी दिली नाही. पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला व चेंबूर मधून विधानसभा निवडणूक लढवली पण त्यात ते पराभूत झाले.

शिर्डीसाठी भाजपनेच नाव सुचवले

२०१४ मध्ये जेव्हा लोकसभा लागल्या तेव्हा नरेंद्र मोदी यांची क्रेझ निर्माण झाली. याचवेळी नेमके भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला व त्यामुळे शिवसेनेला ऐनवेळेला उमेदवार मिळेना. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने व जागा वाटपात शिर्डी शिवसेनेच्या वाट्याला आल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपने शिवसेनेला सदाशिव लोखंडेंचे नाव शिवसेनेला सूचविले.

अखेर तेच नाव फायनल झाले व निवडणुकीच्या अधीपर्यंत शिवसेनेशी संबंध नसणारे लोखंडे शिवसेनेकडून खासदार झाले. त्यांचे मन व विचार नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपशी जवळचे राहिले असून शिवसेनेत दोन गट पडताच ते भाजपच्या गोटात गेलेल्या एकनाथ शिंदेंबरोबर गेले हे सर्वश्रुत आहे.

Ahmednagarlive24 Office