Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना हा पहिला धक्का दिल्याचं मानलं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन राऊतांनी उचलबांगडी केली आहे. राऊतांच्या ऐवजी गजानन किर्तीकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता तसं पत्रच शिवसेनेनं लोकसभा सचिवांना दिल्याचं खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं आहे. लोकसभा सचिवांनी मान्यता दिल्यावर, किर्तीकर शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते होतील. यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सध्या शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंकडे आहे. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेकडून किर्तीकर संसदेत व्हीप काढू शकतात. म्हणजेच किर्तीकरांचा व्हीप राऊतांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊतांची खासदारकीही जाऊ शकते. यामुळे सध्या संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. सध्या लोकसभेत एकूण 18 खासदारांपैकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत 13 खासदार आहेत. तर ठाकरे गटासोबत 5 खासदार आहेत. राज्यसभेत एकूण 3 खासदार आहेत. तिन्ही ठाकरे गटाकडे आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. यामुळे सध्या त्यांना टार्गेट केले कात आहे. संजय राऊत हे जेलमध्ये देखील होते. मात्र नंतर त्यांची सुटका झाली, यानंतर देखील ते सरकारवर रोज निशाणा साधत आहेत.