Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना आता विधानसभेत शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाने ठाकरे गट समर्थक आमदारांना व्हीप बजावला.
यानंतर आता विधान परिषद शिवसेना पक्षावरही हक्क सांगण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे ठाकरे गट मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे. यासाठी आता विधान परिषद शिवसेना पक्षाचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहले आहे.
यामुळे आता शिंदे यांच्या हालचाली दिसून येत आहेत. शिवसेना विधीमंडळ पक्ष बैठकीत बाजोरिया यांची पक्षाच्या प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे शिंदेंच्या या पत्रात नमूद केले आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाच्या सदस्यांवर वर्चस्व राखण्यासाठी शिंदेंचा मोठा डाव मानण्यात येत आहे. पक्षाचा प्रतोदाची नेमणूक झाल्यानंतर शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका, पक्षाचे आदेश घेण्याचा मार्ग एकनाथ शिंदे यांना मोकळा होणार आहे.
दरम्यान, ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील विधान परिषद आमदारांनाही नव्या प्रतोदाचा व्हीप व आदेशाचे नियमानुसार पालन करावे लागणार आहे. शिंदेंचा व्हीप मान्य करावा लागणार आहे, नाहीतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यामुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे.