एकनाथ शिंदे ‘त्या’ दिवशी तासभर रडले; बंडखोर आमदाराने केला खुलासा

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगितले आहे. बंडखोरीचे कारण शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.

विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना या निवडणुकांमधून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून एकनाथ शिंदेंसोबत जो प्रकार सुरु होता, त्यामुळे त्यांचा संताप झाला होता. जाताना एकनाथ शिंदे कमीत कमी एक तास रडत असल्याचे आम्ही पाहिले असा खुलासा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वयाची ४० वर्ष पक्षासाठी देणारी व्यक्ती ढसाढसा रडत असेल तर सर्वसामान्य आमदारांचं काय? असा प्रश्न आम्हाला सतावत होता. तिथे गेल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं, हा सगळा कठोर निर्णय घेताना त्यांना खूप वेदना होत होत्या. पण माघार घेणार नाही असे शिंदेंनी ठरवले होते, असेही संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.